पुण्यात मोदी विरुद्ध धंगेकर? लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या चर्चा अन् धंगेकरांची तयारी सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांकडून आज शुक्रवारी (दि.1) करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्याला संधी मिळाली तर नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढविण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 1 Sep 2023
  • 02:48 pm
Modi vs Dhangekar

Modi vs Dhangekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांकडून आज शुक्रवारी (दि.1) करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्याला संधी मिळाली तर नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढविण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातुन लढले तर आम्ही त्यांचा पराभव करू असंही धंगेकर म्हणाले. पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकर यांचं नाव काँग्रेसकडून चर्चेत आहे.

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रंवीद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला होता. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडूक घेण्यात आल्या होत्या त्यावेळी भाजपचे हेमंत रासणे यांचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला असलेला कसब्यात तब्बल २८ वर्षानंतर धंगेकरांनी विजय मिळवत इतिहास बदलला. कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला होता. 

मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.  भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे. मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ बांधण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीने मोठे आव्हान दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही नवी नणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढविली होती. सध्या भाजपची पकड महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून महाराष्ट्रात अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी  शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्याचे कारस्थान हा याचाच एक भाग समजला जातो आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest