पाणी पुरवठा तक्रारी सोडविण्यासाठी उपाययोजना करणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 7 Sep 2023
  • 04:21 pm
MLA Siddharth Shirole

MLA Siddharth Shirole

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

मतदारसंघातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आ. शिरोळे यांनी  बुधवारी दिनांक ६ सप्टेंबर ला बैठक घेतली. महापालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मतदारसंघातील २४×७ योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या वर्षभरात मतदारसंघातील टाक्यांचे काम पूर्ण होऊन मीटरही बसविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. या कामांबाबत सततचा पाठपुरावा सुरू असून २४×७ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest