भाजप नेत्यांनी स्वत:च्या महिला भगिनींना मासे खायला द्यावे, पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी धुळे येथे एका कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील महिला काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. विजयकुमार गावित यांनी आपल्या घरच्या महिला भगिनींना मासे खायला द्यावे अशी मागणी यांच्याकडून केली जात आहे.
धुळे येथे मच्छीमार व्यावसायिकांसोबत एका कार्यक्रमात गावित असे म्हणाले की, मासे खाल्ल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलते, तसेच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात. ऐश्वर्या राय-बच्चनच्या सौंदर्यबद्दल देखील यावेळी त्यांनी भाष्य केले होते. त्यामुळे महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस नेत्या संगिता तिवारी म्हणाल्या की, “आज पाहायला गेलं तर अमिताभ बच्चन यांची ओळखचं भारत आहे, अशा व्यक्तीच्या सुनेबद्दल बोलताना भाजप नेत्यांना लाज वाटत नाही का ? यांच्या घरात आया-बहिणी नाहीत का ? यांच्या आया-बहिणींना मछली खाऊ घातली का ? भाजपच्या नेत्यांनी लाजच सोडून दिलेली आहे. आपण काय करतोय, काय बोलतोय याचे भान यांना राहिलेले नाही. भाजपच्या नेत्यांचे महिलांवर घाणेरड्या टीका-टिप्पणी करणे वाढत चालले आहे. त्यामुळे, आम्ही आज आंदोलन केले आहे”, असेही त्यांनी यावेळी म्हणाल्या.