"बी जे पी की है ये कहाणी किरीट सोमय्या की हलकट जवानी" - संगीता तिवारी

“बी जे पी की है, ये कहाणी किरीट सोमय्या की हलकट जवानी है, भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती आहे की महिलांचे शोषण करा आणि भोग विलास म्हणून त्यांचा वापर कर, किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ नंतर महिलांनी जागे व्हा व रस्त्यावर येऊन याच्या विरोधात लढा द्या”, असे आवाहन देखील संगीता तिवारी यांनी यावेळी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Tue, 18 Jul 2023
  • 10:19 am
Kirit Somayya : "बी जे पी की है ये कहाणी किरीट सोमय्या की हलकट जवानी" - संगीता तिवारी

"बी जे पी की है ये कहाणी किरीट सोमय्या की हलकट जवानी" - संगीता तिवारी

सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ एका प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या हे वस्त्र विरहित पाहायला मिळत आहेत. भाजपच्या अशा बड्या नेत्याचा असा अक्षपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षातील लोकांनी टीकास्त्र सोडले आहेत

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी या आता आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओ नंतर आता भाजपमधील सर्वच नेत्यांवर संगीता तिवारी यांनी प्रश्नचिन्ह केले आहे. इतकेच नव्हे तर भाजपा हे पदांसाठी महिलांना झोपण्याची ऑफर करता असे देखील आरोप त्यांनी केले आहेत.

बी जे पी की है, ये कहाणी किरीट सोमय्या की हलकट जवानी है, भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती आहे की महिलांचे शोषण करा आणि भोग विलास म्हणून त्यांचा वापर कर, किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ नंतर महिलांनी जागे व्हा व रस्त्यावर येऊन याच्या विरोधात लढा द्या”, असे आवाहन देखील संगीता तिवारी यांनी यावेळी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest