संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचा दावा उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे मोदी यावेळी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी मोदी यांच्याबाबत पुण्यातून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केली आहे. मोदी हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेले आणि भाजपची केंद्रात सत्ता आली तर महाराष्ट्राला मोदींच्या रुपाने पहिला पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल, अशीही अटकळ बांधण्यात येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीने मोठे आव्हान दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही नवी नणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढविली होती. सध्या भाजपची पकड महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून महाराष्ट्रात अनेक प्रयत्न सुरु आहेत. त्यापैकी शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्याचे कारस्थान हा याचाच एक भाग समजला जातो आहे.