तुषार गांधी
मनोहर उर्फ संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी देखील असेच एक वक्तव्य त्यांनी राष्ट्रपिता गांधीजी यांच्या बद्दल केले होते. या वक्तव्यानंतर अनेक गांधीवादींने त्यांच्या विरोधात आंदोलने केल होती. आज पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन येथे तुषार गांधी यांच्याकडून मनोहर भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तुषार गांधी यांच्यासोबत डॉ विश्वमभर चौधरी, डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोथंडीया, संकेत मुनोत व इतर गांधीवादी लोक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांची बेअब्रू व स्त्रियांची बदनामी करणाऱ्या वक्तव्यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. आज पुण्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर या सामाजिक संघटना मोर्चा काढला होता. मात्र, आयुक्तालयावर पोहोचण्यापूर्वी मोर्चा पोलिसांनी काही अंतरावर अलीकडे अडवला होता.