आम्ही काय बेअक्कल आहेत का ?, अजित पवार चांगलेच भडकले
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आमचा डोळा आहे. अशा बातम्या दिल्या जातात. अरे पण खुर्ची एक मग दोघांचा डोळा कसा असेल?, आम्ही काय बेअक्कल आहेत का ? नितीन गडकरींनी पुण्यातील रस्त्यांसाठी ४० हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. या उद्घाटनाला नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले की, चांदणी चौकाचे लोकार्पण होत असताना पुणेकरांना आनंद होत आहे. न्यायालयीन अडथळे दूर करून कामं पूर्ण करण्यात आली. विक्रमी वेळेत जुना पूल पाडण्यात आला. आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनाही येण्याची इच्छा होती. ते सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकले होते, वाहतूक कोंडीने कुणालाही सोडलं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे ते आज आले नाहीत मीडियाने ते लक्षात घेतले पाहिजे.