पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनने ५५० किलो वजनाचा हार आणि जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा ऐकेकाळचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानतंर अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आले आहे.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकाई चौक येथे ढोल ताशाच्या गजरात अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर अजित पवार महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. बैठक संपली की दुपारी दीड वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे अजित पवार काय बोलताना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.