अजित पवारांनी शरद पवार यांना दिली पुन्हा बगल, चर्चांना उधाण
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बैठकीचे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही निमंत्रित होते. परंतु पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांसोबतचा हा कार्यक्रम रद्द केला असून नियोजित कार्यक्रमासाठी अजित पवार दौंडला निघून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत बैठक घेण्यास सातत्याने गैरहजर राहून असे कार्यक्रम टाळत असल्याचे दिसत आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आज अनेक बड्या नेत्यांचा उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. या बैठकीला जयंत पाटील दिलीप वळसे पाटील अजित पवार यांचे सुद्धा नाव होते.
अजित पवार यांचे नाव या बैठकीत असेल तरीदेखील नियोजित कार्यक्रमांचे कारण दे पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांसोबत बैठक टाळली आहे. कुळातील मार्केट याठिकाणी सकाळी साडेसात वाजता अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र मांजरी येथील बैठकीचा कार्यक्रम अजित पवार यांनी रद्द केला आहे.