संग्रहित छायाचित्र
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे शुक्रवारी सकाळी गुरुग्राम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. इंडियन नॅशनल लोक दलाचे ते प्रमुख होते. भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत देवीलाल हे चौटाला यांचे वडील होते.
१९९९ ते २००० या कालावधीत, मुख्यमंत्री असताना ओमप्रकाश चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची अवैध भरती केली होती. या प्रकरणी सीबीआयने ६ जून २००८ रोजी विशेष न्यायालयात चौटाला आणि संबंधित सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. १६ जानेवारी २०१३ रोजी, चौटाला, त्यांचा मुलगा अजय चौटाला, आणि इतर ५३ जणांना न्यायालयाने दोषी ठरवत अटक केली. त्यानंतर २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने त्यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.