संग्रहित छायाचित्र
समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार असून आईवडिलांनी त्यात दखल देण्याची गरज नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. एक तरुणी तिच्या 'समलिंगी जोडीदारा' सोबत राहत होती. मात्र आईवडिलांनी तिला जबरदस्ती करून घरी आणले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान, न्यायालयाने तरुणीच्या बाजूने निकाल देत तिला तिच्या 'जोडीदारा' सोबत राहण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. न्यायमूर्ती आर. रघुनंदन राव आणि न्यायमूर्ती के. महेश्वर राव यांच्या खंठपीठाने हा निकाल दिला.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, तरुणी मागील एका वर्षापासून विजयवाडा येथे तिच्या समलिंगी जोडीदारासोबत विजयवाडा येथे एकत्र राहत होते. त्यानंतर तिचे आई वडील तिला जबरदस्तीने घरी घेऊन आले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली. वडिलांनी तरुणीला तिच्या जोडीदारासोबत एकत्र राहण्यापासून रोखले. तसेच नरसीपट्टणम येथील घरी तिच्या इच्छेविरोधात डांबून ठेवल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
त्यानंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले. सप्टेंबरमध्ये मुलीने पालकांविरोधात तक्रार दिली. तसेच, मुलगी प्रौढ असून आणि तिला तिच्या समलिंगी जोडीदारासोबत राहायचे आहे, असे पोलिसांनी कोर्टात सांगितले.
या प्रकरणावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने तरुणीच्या आईवडिलांना निर्देश दिले की, त्यांनी यात हस्तक्षेप करू नये. मुलगी प्रौढ असून ती तिचे निर्णय स्वतः घेऊ शकते.
न्यायालयाने या समलिंगी जोडप्याचा एकत्र राहण्याचा अधिकार कायम ठेवत जोडीदार निवडण्याच्या अधिकाराची पुष्टी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.