संग्रहित छायाचित्र
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तसा प्रस्ताव राज्यसभेचे राज्यसभेचे मुख्य सचिवांना सादर करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 'एक्स'च्या माध्यमातून दिला आहे.
मंगळवारी इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर विविध पक्षांच्या ७० खासदारांच्या सह्या आहेत. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबतच इतर पक्षांच्या खासदारांचा आहे. धनखड हे पक्षपातीपणे सभागृह चालवत असल्याचा तसेच विरोधी पक्षातील सदस्यांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्यसभेतील एकूण संख्याबळ पाहता अविश्वासाचा हा प्रस्ताव नामंजूर होण्याचीच शक्यता आहे. परंतु सभापती धनखड हे विरोधकांना बोलण्याची संधी देत नाही हे विरोधकांना सिद्ध करायचे आहे. दरम्यान भारताच्या संसदीय इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे.
संसदेत सोरोस विरूद्ध अदानी
सोनिया गांधी सहअध्यक्षा असलेल्या ‘फोरम ऑफ डेमॉक्रसी लिडर्स इन आशिया पॅसिफिक’ या संस्थेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी आर्थिक मदत केली असा आरोप करत भाजपाने काँग्रेसला धारेवर धरले. यासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मात्र गौतम अदानी प्रकरणात झालेली फजिती थांबविण्यासाठी सत्ताधारी कपोलकल्पित बातमीचा आधार घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच भाजपच्या आक्रमकतेला जोरदार उत्तर दिले. दोन्ही सभागृहांत त्यामुळे गदारोळ झाला. अखेर सभागृहांचे कामकाज दुपारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.