राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले, महागाई वाढत असताना सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकीकडे महागाई वाढत असून दुसरीकडे सरकार कुंभकर्णासारखं झोपलं आहे अशी टिका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काही महिलांसोबत भाजी खरेदी करताना दिसत आहे. तसेच यामध्ये ते भाजी विक्रेत्यांना वेगवेगळ्या भाजांचे दर विचारत आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत काही महिला देखील आहेत. दिल्ली मधील गिरी नगर येथील भाजी मार्केटला राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी महागाईमुळे महिलांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे त्यांनी जाणून घेतले.
“लहसुन कभी ₹40 था, आज ₹400!”
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2024
बढ़ती महंगाई ने बिगाड़ा आम आदमी की रसोई का बजट - कुंभकरण की नींद सो रही सरकार! pic.twitter.com/U9RX7HEc8A
यावेळी राहुल गांधी यांनी महिलांना जीएसटीमुळे महागाई वाढली आहे का? असा सवाल केला. त्यावर माहिलांनी महागाईत जीएसटीमुळे मोठी वाढ झाल्याचे सांगितले.
या सगळ्याचा एक व्हिडिओ राहुल यांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे की, एकेकाळी लसणाची किंमत ४० रुपये प्रतिकिलो होती आणि आज ४०० रुपये आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य गृहीणींचे बजेट बिघडले असून सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे.
येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने राहुल गांधी वारंवार सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.