संग्रहित छायाचित्र
स्पायडर-मॅनचा स्टार टॉम हॉलंडने त्याची दीर्घकाळची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री झेंडायासोबत एंगेजमेंट केली आहे. झेंडेया गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्यात मोठी हिऱ्याची अंगठी घालून पोहोचली तेव्हा या कपलच्या एंगेजमेंटचा खुलासा झाला.
टॉम हॉलंड आणि झेंडेया यांच्या एंगेजमेंटचा समारंभ अतिशय खासगी होता. या समारंभात कपलचे कुटुंबीयही उपस्थित नव्हते. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या ८२व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यालाही झेंडाया उपस्थित होती. यावेळी तिने बुल्गारीचा बॉडीकॉन लाँग गाऊन परिधान केला होता. दरम्यान, तिच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, झेंडायाने घातलेली हिऱ्याची अंगठी तिच्या बुल्गारी पोशाखाचा भाग नव्हती. ही हिऱ्याची अंगठी जेसिका मॅककॉर्मॅकची असल्याचे सांगितले जाते. तिची किंमत तब्बल दोन लाख डॉलर्स म्हणजे सुमारे एक कोटी ७१ लाख रुपये आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी, झेंडायाने एक फोटो शेअर केला होता, यामध्ये तिने हिऱ्याची अंगठी घातली होती. हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्या एंगेजमेंटचा अंदाज लावला. अफवांचे प्रमाण वाढत असताना, झेंडायाने सोशल मीडिया पोस्टद्वारे अफवांवर प्रतिक्रिया दिली. तिने एक व्हिडिओ शेअर केला, यामध्ये ती म्हणाली, ‘‘मी आता काही पोस्ट करू शकत नाही का? मी तो फोटो माझ्या टोपीसाठी पोस्ट केला आहे, अंगठीसाठी नाही. तुम्हाला खरंच वाटतं की मी माझ्या एंगेजमेंटची अशी घोषणा करेन?’’
झेंडाया आणि टॉम हॉलंड गेल्या तीन वर्षांपासून डेट करत आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये झेंडायाच्या २५व्या वाढदिवशी टॉम हॉलंडने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देऊन त्यांचे नाते ऑफिशियल केले. यानंतर ही जोडी अनेकदा एकत्र दिसली आहे. दोघे २०२१ मध्ये हॉलिवूड चित्रपट ‘स्पायडर मॅन : नो वे होम’मध्ये एकत्र दिसले होते.