नात्यांची विण, बहिण अन् लग्न...रॉकिंग शिव म्हणतो....
अमोल वारणकर
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात सगळे सण, उत्सव साजरे केले जातात. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांमध्येच या सणाचा उत्साह दिसतो. बहिण भावाच्या नात्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी प्रत्येकच भाऊ तत्पर असतो. त्यात मग सेलेब्रिटी कसे काय अपवाद ठरतील? शूटिंगमधून वेळ काढत सेलिब्रिटींनीही बहिण-भावाच्या नात्याची वीण जपली आहे. त्यातच आपल्या लाडक्या बिग बॉस आणि खतरो के खिलाडी यातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहचलेला बेधडक अभिनेता शिव ठाकरे आणि त्याची बहिण मनिषा यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानिमित्ताने 'सीविक मिरर'शी त्यांनी खास बातचीत केली. यामध्ये बहिणीसोबत असलेले शिवचे नाते, त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, शिवच्या आतापर्यंतच्या प्रवासात मनिषाने दिलेली साथ आणि मनिषा कशी सपोर्ट सिस्टीम बनली? या सगळ्या आठवणींची तिजोरी यातून खुली करणार आहोत...
बालपणाच्या खट्याळ आठवणीत रमला शिव
लहानपणीच्या आठवणी सांगताना शिव म्हणतो, आमचे अनेक असे किस्से आहेत त्यामध्ये एकमेकांची आम्ही सतत खोडी करायचो. दोघंही अनेक खेळ खेळायचो त्यामध्ये चंपुल, विटीदांडू या सारख्या खेळांचा समावेश असायचा, मात्र अनेक वेळा एखादा खेळ खेळत असताना त्यामध्ये मी हरलो तर तो खेळ अर्धवट सोडून निघून जायचो.
कुटुंबियांची थाप अन् महाराष्ट्राचं भरघोस प्रेम
बिगबॉसनंतर माझं सोशल मीडियापाहून अनेकांनी मला माझ्या पीआर टीमबाबत विचारलं होतं. त्यावेळी माझ्याकडे कोणतीही PR टीम नव्हती. माझं सगळं सोशल मीडियाचं काम ताई बघायची. घरातली माणसं घरातली असतात. काहीही झालं तरीही त्यांच्याकडून मिळालेली थाप कायम लक्षात राहते. तसंच कुटुंबियांकडून मिळालेली दाद जग कायम मान्य करतात. माझ्या ताईकडून मिळालेली थाप मा लोकापर्यंत अचूक घेऊन गेली. बालपणीच नाही तर आताही माझा पहिल्या फोनची मानकरी तीच असते.
लग्नाचा विषय खासगी; करियर 'First And Must'
शिव ठाकरेच्या लग्नाविषयी अनेक चर्चा कायम रंगत असतात. मात्र शिवने आणि त्यांच्या बहिणीने हा विषय गुलदस्त्यात ठेवण्याचं ठरवलं आहे. माझ्या आयुष्यात नवरी म्हणून नेमकी कोण येणार हे मलाही अजून कळलं नाही आहे, असं शिवने थेट बोलून टाकलं आहे तर ताईने हा संपूर्ण निर्णय शिववर सोपवला आहे. लग्न हा खासगी विषय आहे मात्र मला आता करियरवर लक्ष द्यायचं आहे. जग दिसतं तसं नसतं म्हणत शिवने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं दिसत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.