संग्रहित छायाचित्र
बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि लेडी अमिता बच्चन असे बिरुद मिळालेली अर्चना पूरनसिंग रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा एकेकाळी जोरात होती. दोघांमधील रिलेशनशिपच्या या चर्चेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
अर्चनाने अनेक मालिका आणि त्यापूर्वी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अर्चनाने १९८७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. वयाच्या ६१ व्या वर्षीदेखील अर्चना या झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अर्चना तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात आनंदी आहे, पण एक काळ असा होता जेव्हा अर्चना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती.
१९९० मध्ये अमिताभ आणि अर्चना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा एका मॅगझिनमध्ये या दोघांचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. फोटोमध्ये अमिताभ आणि अर्चना यांनी अतिशय रोमॅंटिक पोझ दिली होती. त्यामुळे दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. सदर मॅगझिनमध्ये अमिताभ आणि अर्चना हा खास फोटो पोस्ट करत दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं लिहिण्यात आलं होतं. ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी बिग बी यांना सत्य काय आहे, विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. यामुळे चर्चांना बळकटी मिळाली होती.
सर्वत्र चर्चांना उधाण आल्यानंतर अखेर त्या मॅगझिननेच एप्रिल फूलच्या निमित्ताने हे प्रँक केल्याचं जाहीर केलं. या गोष्टीची कल्पना अमिताभ यांना होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्चनासोबत ते फोटोशूट करणारे मुळात बिग बी नव्हतेच. ते अमिताभ यांचे डुप्लिकेट होते. पण त्या हाॅट फोटोमुळे अमिताभ आणि अर्चना यांच्या अफेअरची संपूर्ण बाॅलिवूडमध्ये चर्चा रंगली होती.
अशा या अर्चनाने मंगळवारी (दि. २६) ६२ व्या वर्षात पदार्पण केले. ‘कुछ कुछ होता है’, ‘दे दना दन’, ‘राजा हिंदुस्तानी’, आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत तिने दुसऱ्या इनिंगमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केले. त्यापूर्वी अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये तिने काम केले. तिच्या नावावर हे चित्रपट जोरात चालायचे. आजदेखील ही अभिनेत्री झगमगत्या विश्वात कार्यरत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये ती नियमित हजेरी लावत असते. अर्चना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.