रविनाने सांगितला लेक 'राशा' चा अनुभव
तिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.
'कर्मा कॉलिंग' असे रविनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीरिजचे नाव आहे. ज्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती. ९० च्या दशकांत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेंत्रीमध्ये रविनाचे नाव घेतले जात होते. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना जिंकून घेतले. सध्या ती तिची लेक राशामुळे चर्चेत आली आहे.रविनाने एका मुलाखतीमध्ये आपली लेक आणि तिचा तो एक किस्सा सांगत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. रवीना ही चार मुलांची आई आहे. मात्र तिचे सध्याचे फोटो पाहिल्यावर रविनाचा फिटनेस चर्चेचा विषय आहे.
रविनाने पूजा आणि छाया नावाच्या दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. या सगळ्यात तिच्या मोठ्या लेकीची राशाची नेहमीच चर्चा होत आहे. तिने तिच्या स्वभावाविषयी सांगितले आहे. रविना म्हणते की, आजच्या नव्या पिढीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मला ते राशाकडे पाहिल्यावर जाणवते. ते खूपच वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आता माझी राशा ही ९० च्या दशकांतील कपडे परिधान करताना दिसत आहे. ते माझेच कपडे आहेत.रविनासोबत तिच्या लेकीने राशाने देखील काही फोटो इंस्टावर शेयर केले आहेत. त्या फोटोंवरुन चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. राशाला देखील जुन्या कपड्यांची फार आवड आहे. त्यावरुन मला तिची अनेकदा बोलणी खावी लागतात. मी तिची आई आहे की ती माझी...हेच मला अनेकदा कळत नाही. आता माझी एक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यावरुन मी खूप टेन्शनमध्ये असल्याचे रविनाने सांगितले आहे. माझ्या त्या टेन्शनवरुन राशाही मला बोलते. त्यावर तिचे पती तिला बोलतात की, तू १८ वर्षांची आहे की ८१ वर्षांची. अशा प्रकारे मला नव्या पिढीकडून खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतात, अशी प्रतिक्रिया रविनाने दिली आहे.