संग्रहित छायाचित्र
बाॅलिवूड (Bollywood)ते हाॅलिवूड असा यशस्वी प्रवास केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ही नुकतीच मुंबईमध्ये दाखल झाली आहे. यापूर्वी मुंबईत आल्यावर तिने आपल्यावरील अन्याय आणि बाॅलिवूडमधील गटबाजीबाबत अनेक खुलासे केले होते. यावेळीही ती बाॅलिवूडमधील राजकारणासंदर्भात नवी बाॅम्ब टाकणार की काय, याबाबत बाॅलिवूडप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
प्रियांका चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून आपल्या पती आणि मुलीसोबत विदेशात राहते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या मागील मुंबई दौऱ्यापासून ती सतत चर्चेत आहे. नुकतीच प्रियांका पुन्हा मुंबईत दाखल झाली. सोशल मीडियावर तिने काही खास फोटोही शेअर केले. पापाराझींना फोटोसाठी खास पोज देताना ती दिसली. यावेळी पापाराझींना तिने अभिवादनदेखील केले. यासोबतच प्रियांका मुंबईमध्ये फिरतानादेखील दिसत आहे. इन्स्टा स्टोरीवर तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रियांका ही फार कमी वेळा भारतामध्ये येते. सध्या जियो मामी फिल्म फेस्टिवलसाठी ती भारतात आली आहे.
प्रियांका मुंबईत दाखल होताना तिने गळ्यात घातलेल्या पेंडेंटची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने लाडकी लेक मालती हिच्या नावाचे खास पेंडेंट घातले आहे. मुलगी मालती मेरी हिच्यासोबत प्रियांका काही दिवसांपूर्वीच धमाल करताना दिसली. या क्षणाचे खास फोटोदेखील तिने शेअर केले होते. या फोटोमध्ये मालती ही तिच्या मित्रांसोबत मस्ती करतानाही दिसली होती.
प्रियांकाने फक्त बाॅलिवूडमध्येच नाही तर हाॅलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे. ती पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत विदेशात राहते. मात्र, असे असतानाही प्रियांका नियमितपणे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहत्यांसाठी ती आपले खास फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने आपल्यावरील अन्याय आणि बाॅलिवूडमधील गटबाजीबाबत मोठे खुलासे केले होते. यावेळी तिने बाॅलिवूडमधील अनेक प्रथितयश व्यक्तींवर गंभीर आरोप केले. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. प्रियांकाने सांगितले होते की, तिला कशाप्रकारे चित्रपटांमध्ये घेतले जात नव्हते. तसेच बाॅलिवूडमध्ये सुरू असलेल्या राजकारणाबद्दल ती परखडपणे व्यक्त झाली होती. बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्या संदर्भात प्रियांका यावेळी बोलणार असल्याचे संकेत आहेत.