संग्रहित छायाचित्र
बॉलिवूड (Bollywood) निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असून त्याचा ‘कॉफी विथ करन’ (Coffee with Karan)हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. हल्लीच या कार्यक्रमाचा आठवा सीझन सुरू झाला असून त्यात उपस्थित राहणाऱ्यांमुळे आणि त्यांच्या विधानाने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. बऱ्याच तारे-तारकांनी या सीझनमध्ये हजेरी लावली आहे. त्यामध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, सनी देओल, बॉबी देओलपासून वरुन धवन, सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत अनेकांनी हजेरी लावत कार्यक्रम लोकप्रिय करण्यात हातभार लावला आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
नव्या भागामध्ये राणी मुखर्जी (Rani Mukherjee) व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच दोघींना एकत्र पाहून प्रेक्षक खुश झाले. या कार्यक्रमात दोघींनी अगदी मानमोकळेपणाने गप्पा मारल्या. याच मुलाखतीत करनने राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांच्या त्या बराच काळ रहस्य राहिलेल्या लग्नाबद्दलचा खुलासा वदवून घेतला. २०१४ मध्ये राणी व आदित्य लग्नबंधनात अडकले, परंतु त्यांचा विवाहसोहळा गुप्त होता की त्यामध्ये हातावर मोजता येतील इतकीच मंडळी हजर होती.
यावेळी करन म्हणाला, आदित्य हा माझा या जगातील सर्वात चांगला मित्र आहे. आम्ही बऱ्याचदा त्याच्या आणि राणीच्या लग्नाबद्दल चर्चा केली आहे. ते एक डेस्टिनेशन वेडिंग होते. त्यांचं लग्नं कुठे झालं हे मी आजही कुणालाच सांगू शकत नाही. ते सांगितले तर इतक्या वर्षांनंतरही आदित्य मला खूप रागावेल. आम्ही दिवाळीला काढलेले फोटोसुद्धा तो मला शेअर करू देत नाही. त्याने जेव्हा मला त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्याने मला सक्त ताकीद दिली होती. तो म्हणाला, लग्नात फक्त १८ लोकांनाच निमंत्रण आहे, अन् त्यापैकी लग्नाबद्दल बाहेर वाच्यता करणारा फक्त तूच आहेस, त्यामुळे या लग्नाची बातमी जर बाहेर आली तर ती तुझ्याकडूनच येऊ शकते. त्यावेळी वृत्तपत्रांचा चांगलाच खप होता.
पुढे करन म्हणाला, या लग्नासाठी मला माझ्या आईशी खोटे बोलावे लागले. एप्रिल २०१४ मध्ये आमचा ‘२ स्टेट्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मला त्यावेळी चित्रपटाच्या वितरणासही जाता आले नाही. माझा मॅंचेस्टरमध्ये एक कार्यक्रम आहे असं खोटं सांगून मला लग्नाला जावं लागलं. या गोष्टी मी अजिबात विसरणार नाही.” २०१४ मध्ये आदित्य आणि राणी लग्नबंधनात अडकले अन् पुढच्याच वर्षी त्यांनी अदिरा नावाच्या गोड मुलीला जन्म दिला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.