संग्रहित छायाचित्र
मुंबई : शिल्पा शेट्टी हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत चर्चेत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव आले होते. इतकेच नाही तर काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळही राज कुंद्रावर आली. शिल्पा शेट्टी राज कुंद्रा याला घटस्फोट देणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती. या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज कुंद्रा हा थेट पोर्नोग्राफी प्रकरणाबद्दल बोलताना दिसला.
स्टॅंड अप कॉमेडी करताना राज कुंद्रा याने या विषयावरील मौन सोडले. त्याचा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडीची सुरुवात मास्कमॅन आणि शिल्पा शेट्टी हिचा पती म्हणून करतो. यावेळी काही तो खुलासे करतानादेखील दिसतो.
राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणावर म्हणाला की, ‘‘माझे काम लोकांना कपडे घालणे आहे, काढणे नाही. या दोन वर्षांमध्ये मला पापाराझींमध्ये प्रचंड प्रेम दिसले. पापाराझी यांचे फक्त याकडेच लक्ष असते की, मी काय कपडे घालतो आणि उर्फी जावेद हिने काय कपडे नाही घातले.’’शिल्पा ही आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देते. ती नेहमीच जीम, व्यायाम आणि तिच्या डाएटचे फोटो शेअर करते. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच ‘‘मी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले तरीही माझा कधीच बाॅलिवूडच्या ‘टाॅप टेन’ अभिनेत्रींमध्ये समावेश करण्यात आला नाही,’’ अशी खंत व्यक्त केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.