File Photo
अभिनेत्री दिव्या दत्ताने गुरुवारी (दि. २६) सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर केला. यामध्ये तिने विमानतळावरील तिच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. तिने सांगितले की जेव्हा ती विमानतळावर पोहोचली तेव्हा तिला कळले की तिची फ्लाइट रद्द झाली आहे आणि तिला याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. या घटनेचा तिच्या शूटिंगवरही परिणाम झाला आहे.
दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हीडीओ पोस्ट केला. इंडिगो फ्लाइटला टॅग करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘‘सकाळी या वाईट अनुभवासाठी धन्यवाद. उड्डाण रद्द करण्यात आले असून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मी रद्द केलेल्या फ्लाइटसाठी चेक इन करत आहे. गेटवर फ्लाइटची घोषणा ऐकू येत नाही. मदतीसाठी कर्मचारी नाही! एक्झिट गेटवर खूप त्रास झाला. इंडिगो एअरवेजचे कर्मचारी उपस्थित नव्हते. प्रवाशांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. माझ्या शूटिंगवर परिणाम झाला. मी खूप अस्वस्थ आहे.’’
'इश्क में जीना इश्क में मरना' या चित्रपटाद्वारे दिव्याने १९९४ मध्ये फिल्मी दुनियेत प्रवेश केला. हा चित्रपट फारशी कामगिरी करू शकला नाही. पण तिचे पात्र लोकांना खूप आवडले. याशिवाय दिव्या दत्ता ‘वीर-झारा,’ ‘इरादा,’ ‘ब्लॅकमेल,’ ‘बदलापूर,’ ‘भाग मिल्खा भाग,’ ‘स्पेशल छब्बीस,’ ‘हिरोईन,’ ‘दिल्ली ६,’ ‘उमराव जान,’ ‘लुटेरा,’ ‘ब्लॅकमेल,’ ‘झलकी,’ ‘चॉक और डस्टर’ या चित्रपटांमध्येही दिसली आहे. २०१८ मध्ये तिला 'इरादा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.