अरबाजचे जॉर्जियासोबत ब्रेकअप...!
अल्पावधीतच बाॅलिवूडमध्ये फेमस झालेल्या जॉर्जिया ॲॅड्रियानीने (georgia andrea) अलीकडेच अरबाज खानसोबत (Arbaaz Khan )ब्रेकअप (brake up) झाल्याचे वृत्त खरे असल्याचे सांगितले आहे. ‘‘काही काळापूर्वी आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे दोघांनाही दुःख होते. आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत,’’ असे तिने सांगितले.
जॉर्जिया आणि अरबाजच्या ब्रेकअपचे कारण मलायका अरोरा असल्याची चर्चा होती. मात्र, खुद्द जॉर्जियानेच याचा खुलासा करताना हे कारण फेटाळून लावले. ती म्हणाली, ‘‘अशा प्रकारची चर्चा ही केवळ अन् केवळ अफवा आहे. मलायकामुळे आमच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही.’’ (Arbaaz Georgia Breakup)
एका मुलाखतीत जॉर्जियाने खुलासा केला की, तिचे आणि अरबाज खानचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, विभक्त होऊनही ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्री यापुढेही कायम राहील. तिच्या मनात अरबाजबद्दल नेहमीच फिलिग्स असतील. ‘‘आमचे नाते अधिक काळ टिकणार नसल्याची माहिती आम्हा दोघांनाही होती. कारण आमचा दोघांचा स्वभाव अगदी भिन्न होता,’’ असे ब्रेकअपमागील कारण सांगताना जॉर्जिया म्हणाली.
जॉर्जिया आणि अरबाज बराच काळ सोबत असल्याने त्यांचे ब्रेकअप होणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. यावर जॉर्जिया म्हणाली, ‘‘वेगळे होण्याचा निर्णय घेणे हे जरी कठीण होते तरी त्यावर आम्ही दोघांनी बसून निर्णय घेतला. अरबाज माझ्यासोबत खूप छान वागला. त्याने मला भावनिकरित्या सर्व काही दिले आहे, जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती. त्यांच्याबद्दल चांगले वाटण्यापासून मी स्वतःला कधीही रोखू शकणार नाही. त्यामुळै ब्रेकअपनंतरही मी त्यांच्या संपर्कात का राहू नये? जेव्हा तुम्ही वाईट नातेसंबंधात असता, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहायचे नसते. पण मी कधीच चुकीच्या नात्यात नव्हते. त्यामुळे ब्रेकअप होऊनही आमची मैत्री कायम आहे.’’
यादरम्यान जॉर्जियाने मलायका आणि अरबाज यांच्या नात्याबद्दलही सांगितले. ती म्हणाली, ‘‘घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायकाच्या बाँडचा आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. मलायकासोबत त्यांचे जे नाते होते, ते माझ्या नात्याच्या आड आले नाही. मला स्वातंत्र राहणे आवडते. या स्वातंत्र्याने मी मला पाहिजे तिथे जाऊ शकते. आता मी खूप आनंदी जीवन जगत आहे, कारण मला सर्व काही करायला मिळत आहे.’’ सध्या अरबाज ५६ वर्षांचा तर जाॅर्जिया ३४ वर्षांची आहे. अरबाजचे पहिले लग्न अभिनेत्री मलायका अरोरासोबत झाले होते. त्यानंतर २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अरबाजला त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान जॉर्जिया आवडू लागली. या दोघांची रिलेशनशिप सुमारे चार वर्षे टिकली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.