समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
पुणे- मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक समृद्धी महामार्गावर ट्रॅवल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा जागीच ठार झाला असून 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, पुण्याकडून नागपूरकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स होती. यामध्ये अंदाजे 30 च्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे उपचारासाठी पाठवले तर काहींना पुलगाव येथे पाठविण्यात आले आहे.