Accident on Mumbai-Nashik highway : मुंबई - नाशिक महामार्गावर 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जण जागीच ठार, 14 जखमी

मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघरजवळ भरधाव कंटेनरने इतर पाच वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 15 Jan 2025
  • 12:43 pm

मुंबई - नाशिक महामार्गावर 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जण जागीच ठार, 14 जखमी

ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघरजवळ भरधाव कंटेनरने इतर पाच वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.15)  पहाटे ३.५० च्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने  तीन वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बसला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्यांपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे. तर ६ जण शहापूर येथे उपचार घेत आहेत. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे,  शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.  तसेच, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गावरील पघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Share this story

Latest