Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बस-ट्रकच्या धडकेत एक ठार

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 01:11 pm
Samruddhi Highway Accident, Accident,Samrudhhi Highway Accident,'pune,Nagpur

Samruddhi Highway Accident

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अशातच, आज पहाटेच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला धडक झाली. या धडकेच बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 

 

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.

 

 पुणे वरून नागपूर जाणारी ही ट्रॅव्हल्स होती. यामध्ये अंदाजे 30 च्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीची रेस्क्यू टीम त्याठिकाणी दाखल झाले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे  उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

Share this story

Latest