सोलापूर : ... अन्यथा काँग्रेसचे षडयंत्र उघड करणार; काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आडम मास्तरांचा इशारा

सोलापूर : काँग्रेसने सोलापूर मध्यची उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा ५ नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : काँग्रेसने सोलापूर मध्यची उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा ५ नोव्हेंबरला काँग्रेसबाबतचा राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे. काँग्रेसने ४ तारखेपर्यंत आपल्या उमेदवाराचा अर्ज माघार घ्यावा, असा इशारा आडम यांनी दिला आहे. तसे घडले नाही तर काँग्रेसचे सगळे षडयंत्र उघड करणार असल्याचेही आडम म्हणाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोलापूर मध्यची जागा महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात येणार होती, मात्र काँग्रेसने स्वतःचा उमेदवार इथे जाहीर केला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या संदर्भात १ ऑक्टोबरला माकपचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विनंती करणार आहे.  जर ४ तारखेपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला नाही तर काँग्रेसने केलेले सगळे षडयंत्र उघड करणार असल्याचे आडम यांनी सांगितले. आता नेमके काय झाले आहे याचा खुलासा मी पाच तारखेला करणार आहे. त्याआधी आम्ही सोनिया गांधींची भेट घेऊन काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे आडम म्हणाले.  सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने माकपला न सोडता काँग्रेसचा उमेदवार दिला आहे.

देवेंद्र फडणवीस हा मोठा माणूस
फडणवीस हा मोठा माणूस आहे. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहिलेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? असे नरसय्या आडम म्हणाले. मला जर माणसे ओळखता आली नसती तर ५० वर्षे राजकारणात राहिलो असतो का? असे म्हणत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिउत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडम मास्तर यांना माणसे ओळखता आली नाही, अशा पद्धतीची टीका केली होती. दरम्यान ‘मी काँग्रेसला ओळखण्यात ही कुठेही कमी पडलो नाही, सुशीलकुमार मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने आम्हाला जागा सोडली होती’ असे आडम यावेळी म्हणाले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest