सोलापुरात काँग्रेसला दे धक्का; पाच माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Solapur Central Constituency,Congress, BJP, Fadnavis,bearers

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

सोलापूर  : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, सिद्राम अट्टेलुर, वैष्णवी करगुळे, सरस्वती कासलोलकर, जेम्स जंगम या माजी नगरसेवकसह युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे, उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची होती. मात्र, मोची समाजाला उमेदवारी न देता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. शहर मध्यमधून उमेदवारी न मिळाल्याने मोची समाजाने काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे समाजातील माजी नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रचारापासून स्वतःला अलिप्त ठेवले होते. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

काँग्रेसला बसणार नाराजीचा फटका

सोलापूर मध्यच्या जागेवरुन मोठे वादंग निर्माण झाले आहे. या जागेवर मोची समाजाचा उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात येणार होता. मात्र काँग्रेसने शहराध्यक्ष चेतन नरोटेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ माकपलाही नाही आणि मोची समाजाच्या उमेदवारालाही नाही. नाराज झालेल्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरात आता चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून देवेंद्र कोठे मैदानात उतरले आहेत. तर एमआयएमकडून फारुख शाब्दि तर माकपकडून नरसय्या आडम हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत जास्त चुरस 

लोकसभा निवडणुकानंतर सोलापूर जिल्ह्यात अंत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव करत महाविकास आघाडीने जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मोठी रंगत आली आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest