तू खालच्या जातीची... महिलेसोबत लग्नास नकार, बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी नैसर्गिक आणि नैसर्गिक शारीरिक संबंध (Physical relationship) प्रस्थापित करीत त्यानंतर तरुणीला 'तू दलित समाजाची आहेस' असे म्हणत लग्न करण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस (Lonikand Police) ठाण्यात आरोपी विरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्च २०१८ पासून २२ मे २०२३ पर्यंत बकोरी रोड वाघोली या ठिकाणी घडली.
नितेश मनोज शुक्ला (वय ३०, रा. महाराज गंज, गोरखपुर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत वेळोवेळी नैसर्गिक आणि नैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोविड काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्याने या महिलेला 'तू एससी जातीची आहेस आणि मी जातीने ब्राह्मण आहे. माझ्या घरातील लोक तुला सून म्हणून स्वीकारणार नाहीत. तु मला परत भेटू नको. परत संपर्क करायचा प्रयत्न केला, तर जिवंत सोडणार नाही.' अशी धमकी देऊन शिवीगाळ केली आणि त्यानंतर लग्न न करता त्यांची फसवणूक देखील केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.