Pune Murder News : कंपनी मालकांकडून कामगाराचा मारहाण करून खून; माजी पोलिसाचाही आरोपींमध्ये समावेश

(Pune Crime News) पगारावरून होत असलेल्या वादामधून कामगाराला बेदम मारहाण करीत त्याचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकांसह काही सामाजिक कार्यकर्त्या विरोधात आणि एका माजी पोलिसा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Fri, 3 Nov 2023
  • 11:00 am
Pune Murder News

संग्रहित छायाचित्र

पुणे : (Pune Crime News) पगारावरून होत असलेल्या वादामधून कामगाराला बेदम मारहाण करीत त्याचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकांसह काही सामाजिक कार्यकर्त्या विरोधात आणि एका माजी पोलिसा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Murder News) हा प्रकार १ सप्टेंबर २०२३ रोजी घडला होता. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून चतु:शृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) तपास करीत हा खून असल्याचे निष्पन्न केले. हा सर्व प्रकार शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये घडला होता.

अविनाश भिडे (Avinash Bhide) (वय ३६) असे खून झालेल्याचे नाव आहे. कंपनी मालक शेखर महादेव जोगळेकर (Shekhar Mahadev Joglekar) (वय ५८, रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२), माजी पोलीस आणि राजकीय कार्यकर्ता दयानंद सिद्राम इरकल (Dayanand Sidram Irka) (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (वय ५३, रा. काकडे पॅलेसमागे, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (वय २९, रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपळे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह आणखी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी रेश्मा अनिल भिडे (वय ३०, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांचे पती अविनाश भिडे (वय ३६) हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून नोकरी करीत होते. या दोघांमध्ये पगारावरून वाद होत होते. यापूर्वीही शेखर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करून मारहाण करून ऑफिस मधून हाकलून दिलेले होते. घटनेच्या दिवशी देखील त्यांनी आपसात संगनमत करून अविनाश यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगंन्नाथ जानकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest