Pune Crime : कार बाजूला घ्यायला लावल्याने महिलेचा विनयभंग

रस्त्याच्या मध्ये लावलेली कार बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणामधून एका महिलेसह तिच्या तरुण मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा येथील श्रद्धानगरमध्ये घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोन जणांवर विनयभंग

molestation

संग्रहित छायाचित्र

पुणे : रस्त्याच्या मध्ये लावलेली कार बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणामधून एका महिलेसह तिच्या तरुण मुलीला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा येथील श्रद्धानगरमध्ये घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोन जणांवर विनयभंग (molestation) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, फिर्यादी महिलविरुद्ध देखील मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून एका महिलेसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक श्रद्धानगर येथे असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर गाडी लावून उभे होते. त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने ही कार बाजूला घेण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी कार बाजूला घेण्यास नकार दिला. दरम्यान, तिथे आलेल्या आरोपीच्या पत्नीने या मुलीच्या गळ्याला पकडले. मुलीने तिला दूर ढकल्यानंतर खाली उतरलेल्या आरोपीने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी त्याठिकाणी गेल्या. तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांची मुलगी मध्ये आली असता तिला अश्लील स्पर्श करीत विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी महिलेने ‘हा एरिया आमचाच आहे. तुम्हाला सोडणार नाही.’ असे म्हणत धमकी दिली. फिर्यादी यांचे केस पकडून त्यांना जमिनीवर ढकलून दिले. त्या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला आणि कमरेला मार लागला असे तक्रारीत म्हटले आहे. 

तर, विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेसह तिच्या मुलीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी विरुद्ध बाजूच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला पतीसह श्रद्धानगर येथे माहेरी आलेली होती. परत जाण्यासाठी त्यांच्या पतीने गाडी काढली. फिर्यादी महिला गरोदर असल्याने त्यांच्यासाठी गाडी थांबवलेली होती. याच वेळेत पाठीमागून आरोपी महिला आणि तिची मुलगी आली. त्यांनी ही गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा, फिर्यादीच्या पतीने गरोदर पत्नी चालत येत असून ती गाडीत बसताच आम्ही निघतोय असे सांगितले. त्यावेळी या महिलांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. याचा जाब विचारला असता फिर्यादीला आणि त्यांच्या पतीला हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest