संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल उत्सव डीलक्स (Hotel Utsav Deluxe) येथे एका प्रवाशाने रूम भाड्याने घेऊन त्याचे पैसे ट्रान्सफर केल्याचे भासवत ७५ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस (Market Yard Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ जुलै २०२३ ते २६ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान घडला. (Pune Crime News)
कृपालसिंग प्रवीणभाई गोहेल (Kripal Singh Pravinbhai Gohel) (रा. राजकोट, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश सुभाष तुंगतकर (Mahesh Subhash Tungatkar) (रा. मोहम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. कृपाल सिंग गोहेल हा पुण्यामध्ये कामानिमित्त आलेला होता. त्यावेळी त्याने हॉटेल उत्सव डीलक्स येथे रूम भाड्याने घेतलेली होती. या रूमच्या भाड्याचे पैसे यूपीआयद्वारे ऑनलाईन पाठवल्याचे त्याने भासविले. हॉटेलच्या व्हाट्सअप मोबाईल नंबरवर खोटे बनावट स्क्रीन शॉट पाठवून भाडे भरल्याचे भासविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात पैसे न भरता ७४ हजार ९९७ रुपये ही फसवणूक करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.