Pune Crime News: पतीकडून पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पुणे : पतीने पत्नीसोबत तिच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक आणि नैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या महिलेने नकार दिला असता तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि तिच्या लहान बहिणीला पळवून

Rape

संग्रहित छायाचित्र

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पतीने पत्नीसोबत तिच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक आणि नैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या महिलेने नकार दिला असता तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि तिच्या लहान बहिणीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० सप्टेंबर २०२२ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान कात्रज कोंढवा रस्त्यावरील पीडित महिलेच्या घरी घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे २९ वर्षीय पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेची इच्छा नसताना वेळोवेळी तिच्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या महिलेने त्याला नकार देऊन सुद्धा जबरदस्तीने त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केले. तिला वारंवार पॉर्न व्हिडिओ दाखविण्यात आले. मोबाईलमध्ये केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग इंटरनेटवर टाकून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, तिच्या लहान बहिणीला पळवून नेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest