Pune : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

प्रेम प्रकरणामधून (Love affair) प्रियकराकडून लग्नासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बिबवेवाडीमध्ये असलेल्या अप्पर इंदिरानगरमध्ये २ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त (Suicide Attempt) केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Suicide attempt

संग्रहित छायाचित्र

लग्नासाठी तगादा लावत दिला मानसिक त्रास, तरुणीची होती शिक्षणाची इच्छा

पुणे : प्रेम प्रकरणामधून (Love affair) प्रियकराकडून लग्नासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बिबवेवाडीमध्ये असलेल्या अप्पर इंदिरानगरमध्ये २ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली. या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त (Suicide Attempt) केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उत्कर्षा संतोष लोंढे (Utkarsh Londhe)  (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य चंद्रकांत ढावरे (वय २५, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध भादवि ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष गोकुळ लोंढे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षा ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपी आदित्य आणि उत्कर्षा यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेम संबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचा त्या दोघांनी निर्णय घेतलेला होता. या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत आदित्यच्या आणि तिच्या कुटुंबीयांना कल्पना होती.

दरम्यान, आदित्य नोकरीच्या शोधात होता. नोकरी मिळाल्यानंतर लग्न करू असे त्याने उत्कर्षाला सांगितले होते. याच कालावधीत त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याने एक वर्षांच्या आत लग्न करायला हवे, अन्यथा तीन वर्ष लग्न करता येणार नाही अशी प्रथा असल्याचे सांगत लग्नासाठी तगादा लावला. परंतु, तिने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असल्याचे सांगत शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न करू अशी विनंती केली. मात्र, त्याने तिला लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तसेच, तिला मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात स्वयंपाक घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest