संग्रहित छायाचित्र
शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरुड भागातील एकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादीच्या मोबाइलवर मेसेज पाठवला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष त्याने फिर्यादी यांना दाखवले. तसेच सोशल मीडियावरील एका ग्रुप मध्ये फिर्यादी यांना सहभागी करून घेतले.
शेअर बाजारातून परताव्याचे आमिष दाखवत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. आमिषाला भुलून तक्रारदाराने सायबर चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्याने त्याचा मोबाइल बंद करून ठेवला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.