संग्रहित छायाचित्र
लोणावळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरातून दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला घरातल्या लोकांनी चांगलाच चोप दिला. लोणावळा येथे ही घटना घडली आहे.
याप्रकरणी अमर त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे एका घरात एक दोन वर्षाची मुलगी खेळत होती. या चिमुकलीचे अपहरण करण्याचा त्रिपाठी याचा डाव होता. रविवारी दुपारी एकच्या सुमारास तो थेट घरात शिरला. त्रिपाठी चिमुकलीला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना ती मोठ्याने रडायला लागली. मुलगी का रडत आहे हे बघण्यासाठी तिची आई बाहेर आली. त्यावेळी आईने मुलीला कोणीतरी घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं.
त्यानंतर घरच्यांनी त्रिपाठी याला पकडला आणि चांगलाच चोपला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, त्रिपाठीच्या चिमुकलीचे अपहरण करण्याच्या प्रयत्नामागचा उद्देश्य काय होता याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.