Pune Crime News : बदला घेण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एरंडवणे परिसरातून घेतले ताब्यात

पुणे : धमकी दिल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने तरुणाला अटक केली आहे. तरुणाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 04:31 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : धमकी दिल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने तरुणाला अटक केली आहे. तरुणाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यासोबच तरुणाला पिस्तूल पुरवणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 

आकाश बळीराम (वय २४, रा. नवशा मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याला पिस्तूल देणारा सुभाष बाळू मरगळे (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते यांना एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर एक तरुण देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यावर त्याने त्याचे नाव आकाश बळीराम असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस  असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.    

अधिक चौकशी केली असता समजले की, आरोपी आकाशचे त्याच्या चुलत मामासोबत जमिनीच्या मालकीवरुन वाद झाले होते. चुलत मामाने आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मामाचा बदला घेण्यासाठी सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने हडपसरमधील एकाकडून पिस्तूल विकत घेतली अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. 

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे,सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, ज्ञानेश्वर ढवळे, शरद वाकसे, संजीव कळंबे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी ही कामगिरी केली.

Share this story

Latest