Pune Crime : पीएमपीएल बसमध्ये चढताना चोरट्यांनी चोरली महिलेच्या हातातील सोन्याची पाटली

पीएमपीएल बसमध्ये (PMP) चढत असताना अनोखळी चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कर्वेरस्त्यावरील पीएमपीएलच्या सोनल हॉल बसस्टॉपवर घडला.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : पीएमपीएल बसमध्ये (PMP) चढत असताना अनोखळी चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कर्वेरस्त्यावरील पीएमपीएलच्या सोनल हॉल बस स्टॉपवर घडला. शहरात पीएमपीएल बसस्थानकावर चोरीच्या घटांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. बसस्थानकावर हे चोरटे गर्दीचा फायदा घेत आपला हात साफ करताना दिसून येतात. (Pune Crime) 

याप्रकरणी ६१ वर्षीय महिलेने (गोखलेनगर) डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एक अनोळखी इसम व महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कर्वेरस्त्यावरील पीएमपीएलच्या सोनल हॉल बसस्थानकावर बसमध्ये चढत होत्या दरम्यान याचवेळी या चोरट्यांनी महिलेच्या डाव्याहातातील सोन्याची ७० हजार रुपये किंमतीची पाटली हिसकावून नेली. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest