संग्रहित छायाचित्र
पुणे : योगा क्लाससाठी (Yoga class) रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र (Mangalsutra) हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना औंध येथील गायकवाड पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune Crime News)
याप्रकरणी किलोरियल पार्क, औंध येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने फिर्यादी दिली आहे. पाटील या गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गायकवाड पेट्रोल पंपा समोर असलेल्या रस्त्याने चालत जात होत्या. त्या योगा क्लाससाठी निघालेल्या होत्या. त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या तीन आरोपींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून पळ काढला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.