संग्रहित छायाचित्र
पुणे : आपला पती पूर्ण पुरुष नसून अर्ध पुरुष असल्याची माहिती समजल्यानंतर या संदर्भात सासरच्या व्यक्तींकडे विचारणा केल्यावर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ (mental torture) करण्यात आला. तसेच, माहेरी पाठवून सात लाख रुपये घेऊन ये नाहीतर पोलिसांमध्ये पकडून देईन अशी धमकी दिल्याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासू, सासरे (सर्व रा. पनवेल, रायगड) यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार पनवेल येथील खांदा कॉलनी मध्ये घडला. पीडित महिला आणि तिच्या पतीचे १६ जानेवारी २०२२ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसातच आपला पती हा पूर्ण पुरुष नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्याचे वागणे देखील संशयास्पद होते. लग्नानंतर त्याने या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. तो शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यामध्ये असमर्थ होता. लग्नापूर्वी ही गोष्ट महिलेपासून लपवून ठेवण्यात आली. यासंदर्भातील सासरच्या व्यक्तींकडे जाब विचारला असता तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आणि तिला माहेरी पाठवून देण्यात आले. पुन्हा घरी यायचे असल्यास सात लाख रुपये आण नाहीतर तुला पोलिसांमध्ये पकडून देईन आणि बदनामी करीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.