Sassoon Hospitals : ससूनच्या अधिकाऱ्यांचे शिक्के चोरले; तयार केले बनावट मेडिकल सर्टिफिकेट

ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) वैद्यकिय अधीक्षक कार्यालयात घुसून शासकीय शिक्के चोरून नेत बनावट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (Fake medical fitness certificat) तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sassoon Hospitals

ससूनच्या अधिकाऱ्यांचे शिक्के चोरले; तयार केले बनावट मेडिकल सर्टिफिकेट

पुणे : ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospitals) वैद्यकिय अधीक्षक कार्यालयात घुसून शासकीय शिक्के चोरून नेत बनावट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट (Fake medical fitness certificat)  तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस (Bundagarden Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ डिसेंबर रोजी घडला. 

प्रकाश पांडूरंग मोंडकर (Prakash Pandurang Mondkar) (वय ३४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) आणि सतपाल पवार (ओगलेवाडी, कराड, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मोंडकर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (वय २६, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी ससून रुग्णालयात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी वैद्यकिय अधीक्षक कार्यालयात प्रवेश केला. वैद्यकीय अधिक्षकांच्या नावाने असलेला तसेच ऑपथाल्मोलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. प्राजक्ता भैलुमे यांच्या नावाचे शिक्के चोरले. डॉक्टर व कर्मचारी यांची नजर चुकवून हे शिक्के चोरून नेत त्याचा वापर करून बनावट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तयार केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest