Pune Crime : मित्राला वाचवायला गेलेल्यावर कोयत्याने वार; हातातील कोयता हवेत फिरवून केली दहशत निर्माण

मित्राचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्यावर कोयत्याने वार खुनाचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात चंदन नगर पोलीस (Chandan Nagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Pune Crime

मित्राला वाचवायला गेलेल्यावर कोयत्याने वार; हातातील कोयता हवेत फिरवून केली दहशत निर्माण

पुणे: मित्राचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्यावर कोयत्याने वार खुनाचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात चंदन नगर पोलीस (Chandan Nagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सौरभ संतोष पाडळे (रा.सोमनाथ नगर, वडगावशेरी) यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News) 

त्यानुसार अनुज जितेंद्र यादव, ऋषिकेश टुणटुण चव्हाण(वय १८), आकाश भारत पवार(वय २३), अमोल वसंत घोरपडे(वय ३०), अक्षय तापकीर, राहुल बारसे आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनुज, ऋषिकेश, आकाश हे तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यासह चोरपडे याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार वडगावशेरीतील आनंद पार्ककडून वडगाव शेरीकडे रस्त्यावरील दिगंबर नगर येथील पवन सुपर मार्केट शेजारी घडला.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाडळे यांचा मित्र ऋषिकेश ढोरे याची आणि आरोपी आकाश पवार यांचे वाद झाले होते. वाद मिटविण्यासाठी पाडळे ढोरे याच्या सोबत गेले होते. त्यावेळी आरोपी आकाशने पाडळे यांच्या कानाखाली मारली. त्यानंतरी काही कळायच्या आत आरोपी अनुजने ढोरे याचा खुन करण्याच्या हेतूने त्याला कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केली. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करुन यांना कोणालाच सोडू नका, असे म्हणत तेथे पडलेल्या दगड आणि विटांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्या दरम्यान ढोरे याला वाचविण्यासाठी पाडळे यांचे मित्र अभि आगरकर आणि योगेश गेले असता त्या दोघांवरही कोयत्याने वार करुन जखमी केले. हातातील कोयता हवेत फिरवून मधे कोणी आला तर सोडणार नाही. अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest