संगीता वानखेडे यांना माजी नगरसेवकाकडून धमकी

पिंपरी-चिंचवड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील तसेच शरद पवार यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतलेल्या संगीता वानखेडे यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

संग्रहित छायाचित्र

मनोज जरांगे पाटील तसेच शरद पवार यांच्याविरोधात घेतली होती पत्रकार परिषद

सीविक मिरर ब्यूरो

पिंपरी-चिंचवड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील तसेच शरद पवार यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतलेल्या संगीता वानखेडे यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.    

संगीता रवींद्र वानखेडे (रा. सांगवी, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरुवारी (२२ फेब्रुवारी) सायंकाळी तक्रार अर्ज दिला. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, वानखेडे यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही खुलासे केले.

त्यानंतर वानखेडे त्यांच्या सांगवी येथील घरी सायंकाळी पाच वाजता पुन्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी घरी पोहचल्या. त्यावेळी खेड तालुक्यातील चाकणचे माजी नगरसेवक राहुल कांडगे हे वानखेडे यांच्या घरासमोर आले. कांडगे यांनी वानखेडे यांना जाब विचारला. ‘‘तू आमच्या शरद परवार साहेबांच्या विरोधात का बोललीस, तुला कोणी अधिकार दिला आणि तुला किती पैसे दिले त्यांच्या विरोधात बोलायला’’, असे कांडगे म्हणाले. तसेच त्यांनी वानखेडे यांना शिवीगाळही केली.

संगीता वानखेडे यांनी यापूर्वी छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलल्या होत्या. त्यावेळीही कांडगे याने वानखेडे यांच्या घरी येऊन धमकी दिली होती. तू आमच्या नेत्याच्या विरोधात का बोललीस, मी तुला संपवून टाकीन, आमच्या बायका तुला मारणार आहेत, असे बोलून शिवीगाळ केली होती. याप्रकरणी कांडगे यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वानखेडे यांनी अर्जाव्दारे केली आहे.

पोलीस संरक्षणाची मागणी

संगीता वानखेडे त्यांच्या दोन मुलींसह सांगवी येथे वास्तव्यास आहेत. मुलाखत प्रसारीत झाल्यानंतर त्यांना धमकीचे खूप फोन आणि मेसेज आले. हा सायबर क्राइम असून माझ्यावर शाब्दिक अत्याचार होत आहे. तो थांबवण्यात यावा, तसेच मला पोलिस संरक्षण द्यावे आणि दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वानखेडे यांनी अर्जातून केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest