Pune Crime : जमिनीच्या वादातून निवृत्त पोलीस निरिक्षकावर हल्ला; पोलीस दलात खळबळ

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख (Wazir Sheikh) यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक हल्ला करीत त्यांच्या डोक्यात दगड घातला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वानवडी येथील केदारी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या काकडे मैदानावर घडली.

Pune Crime

Pune Crime : जमिनीच्या वादातून निवृत्त पोलीस निरिक्षकावर हल्ला; पोलीस दलात खळबळ

पुणे : (Pune Police) सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख (Wazir Sheikh) यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक हल्ला करीत त्यांच्या डोक्यात दगड घातला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वानवडी येथील केदारी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या काकडे मैदानावर घडली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

वजीर हुसेन शेख (वय ५८, रा. कोंढवा) असे हल्ला झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला जमिनीच्या वादामधून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रमोद काकडे नावाच्या संशयिताचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. काकडे मैदानावर हुरडा पार्टी आयोजित केली होती. यावेळी शेख देखील तेथे गेले होते. तसेच ते अनेकदा या मैदानावर मित्रांना भेटायला जात असत. शुक्रवारी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे मैदानावर गेले होते. आठ साडेआठ वाजता सर्वजण घरी गेल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालण्यात आला. त्यांच्या चेहऱ्याचे हाड फ्रक्चर झाले आहे. त्यांच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काकडे मैदानाच्या जमिनीचा अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. ही महार वतनाची जागा आहे. यातील वाद मिटवण्यात आला होता. ही जागा वजीर शेख आणि त्यांचे अन्य भागीदार यांनी एकत्र येत विकसित करायला घेतली होती. संशयित काकडे हा नेहमी शेख यांच्या कार्यालयात येऊन बसत होता. त्यांच्याकडून दारूसाठी पैसे घेऊन जायचा. त्याने शुक्रवारी देखील त्यांच्याकडे पैसे मागीतले होते. मात्र, शेख यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. हल्ल्यामागे हे कारण आहे की जागेच्या वादाचे करण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest