पुणे: सात वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत बलात्कार; ७८ वर्षांच्या पिसाटाने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

पुणे : घरामध्ये खेळायला आलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७८ वर्षांच्या पिसाटाने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत या अल्पवयीन मुलीला स्वत:च्या गुप्तांगावरील केस काढायला लावले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Fri, 13 Sep 2024
  • 05:58 pm

संग्रहित छायाचित्र

पुणे : घरामध्ये खेळायला आलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७८ वर्षांच्या पिसाटाने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत या अल्पवयीन मुलीला स्वत:च्या गुप्तांगावरील केस काढायला लावले. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पिडीत मुलीने आजीला सांगितल्यानंतर उघडकीस आली. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

मधुकर पिराजी थिटे (Madhukar Piraji Thite) (वय ७८, रा. धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता १०९, ६४ (१), ६५ (२), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८ तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या ६१ वर्षीय आजीने फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलिसांकडून (Sahakarnagar Police) मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा ग्रामीण भागात राहण्यास आहे. बालाजीनगर (Balajinagar) येथील एका सोसायटीमध्ये त्याचा मुलगा आणि सून राहण्यास आहेत. याठिकाणी आरोपी जाऊनयेऊन असतो. पिडीत मुलीचे कुटुंब आरोपीच्या घराच्या शेजारीज राहण्यास आहे. या मुलीचे वडील रिक्षाचालक आहेत. तर, आईला मानसिक आजार आहे. त्यामुळे पिडीत मुलीचा आणि तिच्या आईचा आजी सांभाळ करते. पिडीत मुलगी दुसरीमध्ये शिकते.

पिडीत मुलगी नेहमी आरोपीच्या घरी खेळायला जात असते. ती ६ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे खेळ होती. तेव्हा आरोपीने तिला स्वत:च्या घरी खेळायला नेले. त्यावेळी आरोपीच्या घरात कोणीच नव्हते. ही मुलगी खेळत असतानाच त्याने घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर त्याने स्वत:चे कपडे काढले. पिडीत मुलीला धमकावत स्वत:च्या गुप्तांगावरील केस काढायला भाग पाडले. त्यानंतर, तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेले. तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने ही मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून धरले होते. तसेच, तिच्या गळ्यावर चाकू ठेवत तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, आरोपीने घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगायचे नाही. गप्प बसायचे, आईला व वडिलांना कोणालाच काही सांगायचे नाही. पोलीस जर माझ्या घरी आले तर मी तुझा जीव घईन अशी धमकी दिली. त्यानंतर देखील तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पिडीत मुलीला दोन तीन दिवस त्रास होऊ लागल्यानंतर तिने याबाबत आजीला माहिती दिली. आजीने तिची पाहणी केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. आजीने पिडीत मुलीच्या वडिलांशी याविषयी चर्चा केली. त्यानंतर, या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की पिडीत मुलीने आजीला घडलेला प्रकार कथन केल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. गुन्हा नोंदवीत तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली आहे. मुलगी सुरक्षित आहे. आमचा पुढील तपास सुरू आहे.

सहकारनगर पोलिसांनी ८ वर्षीय मुलीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याप्रकरणी ७० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत धनकवडी भागात घडला. याप्रकरणी पोलिसांनी महावीर श्रीमलजी सिंगवी (वय ७०, रा. तानाजीनगर, धनकवडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पिडीत मुलीला आरोपी मागील एक महिन्यापासून चॉकलेट घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत जवळ बोलवायचा. तिला खाऊचे आमिष दाखवीत अश्लील स्पर्श करायचा. तसेच, तिला स्वत:च्या घरी येण्यासाठी धमकावायचा. ही माहिती पिडीत मुलीने आईला दिली. त्यानंतर, पिडीत मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिंगवीला अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest