Pune: मारलेल्या दगडाने महिला जखमी

पुणे : दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तीने मारलेला दगड लागल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिच्या डोळ्याला इजा झाली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी हडपसर येथील रामटेकडी

Pune Police

संग्रहित छायाचित्र

हडपसर येथील रामटेकडी येथील किर्लोस्कर पुलावर घडली घटना

पुणे : दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तीने मारलेला दगड लागल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिच्या डोळ्याला इजा झाली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी हडपसर येथील रामटेकडी येथील किर्लोस्कर पुलावर घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायल गिरमकर (वय २७) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आकाश संतोष यादव (वय २४, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आकाश आणि त्यांची बहीण पायल हे दोघे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने मारलेला दगड पायल यांच्या उजव्या डोळ्यावर लागला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest