CIVIC MIRROR EXCLUSIVE: पुण्याच्या पाच 'जिगरबाज' पोलिसांना दहा लाखांचे रिवॉर्ड

पुणे : गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जिगरबाज कारवाई करीत दोन 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला

CIVIC MIRROR EXCLUSIVE: पुण्याच्या पाच 'जिगरबाज' पोलिसांना दहा लाखांचे रिवॉर्ड

एनआयच्या अधिकाऱ्यांनी केले कौतूक; गस्ती दरम्यान पकडले गेले होते दहशतवादी

पुणे : गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जिगरबाज कारवाई करीत दोन 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. या पाच जिगरबाज कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल दहा लाखांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. शुक्रवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना  सन्मानित केले आणि त्यांना पारितोषिकाची रक्कम दिली. पाच दिवसांपूर्वीच 'पुणे टाईम्स मिरर' आणि 'सीविक मिरर'कडून या पाच जणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'बिग सॅल्यूट' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

यावेळी एनआयएचे महानिरीक्षक, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, अरविन्द चावरिया आदी उपस्थित होते. पोलिसांनी कोथरूडमध्ये कारवाई करीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या अटकेमुळे देशभरातील दहशतवादी हल्ल्यांचा मोठा कट उधळला गेला असून या दहशतवाद्यांनी देशभरात मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला करण्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले आहे.  'पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे 'इसिस मॉड्युल' उघडकीस आले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली. त्याबद्दल एनआयएने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फरार म्हणून घोषित केलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पकडण्यात यश आले होते. पोलीस शिपाई अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण यांनी गस्तीदरम्यान वाहनचोरी करीत असलेल्या दोन दहशतवाद्यांना हटकले होते. त्यांनी पोलीस हवालदार बालारफी शेख, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ यांची देखील मदत घेतली. त्यानंतर त्यांची घरझडती घेण्यात आली. त्यावेळी हे आरोपी दहशतवादी असल्याचे समोर आले.  त्यामध्ये 'अह उल सुफा' या दहशतवादी संघटनेच्या देशविघातक कट कारस्थानांचा पर्दाफाश झाला होता.

पुढे हा तपास एटीएस आणि नंतर एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला. एनआयएनकडून याचा सखोल तपास करीत एक एक कडी उलगडत नेली. या तपासात आयसीसचे महाराष्ट्र मोड्यूल उघडकीस आले. या कारवाईमुळे देशावरचे मोठे संकट टळले. त्याकरिता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या पांच अंमलदारांना दहा लाख रुपयांचे रोख रिवार्ड व सर्टिफिकेट देण्यात आले. तर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. अशाप्रकारे देशाच्या सुरक्षेमध्ये आपल्या जीवावर उदार होत दहशतवाद्यांना जेरबंद करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest