Pune News: छेडछाडीला कंटाळून मुलीने टाळले कॉलेजचे अ‍ॅडमिशन

पुणे : सोसायटीच्या लिफ्टच्या मेंटेनन्सवरुन झालेल्या वादामधून एका महिलेच्या १६ वर्षीय मुलीचा वारंवार डोळा मारून तसेच तिचा हात पकडून सातत्याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

महिला आयोगाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : सोसायटीच्या लिफ्टच्या मेंटेनन्सवरुन झालेल्या वादामधून एका महिलेच्या १६ वर्षीय मुलीचा वारंवार डोळा मारून तसेच तिचा हात पकडून सातत्याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून आणि आरोपीला घाबरून  पिडीत मुलीने कॉलेजला प्रवेशच घेतला नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी थेट तिच्या आईकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

सचिन शंकर बोराडे (वय ४४, रा. राजलक्ष्मी हाईट्स, धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादवि ३५४, ३५४ (ड), ५०६ सह पोक्सो अॅक्ट ८, १२ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे.  तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक युवराज पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडे आणि पिडीत मुलीचे कुटुंब एकाच इमारतीमध्ये राहण्यास आहे. इमारतीच्या लिफ्टच्या मेंटनन्सवरुन जानेवारी २०२३ मध्ये आरोपी बोराडे आणि पिडीत मुलीच्या आईमध्ये वाद झाले होते. तेव्हापासून बोराडे हा पिडीत मुलीकडे पाहून अश्लील हातवारे करीत होता.

तसेच, तिच्याकडे फोन नंबर मागत होता. तिला पाहून त्याने अनेकदा डोळा मारून लज्जा निर्माण करीत होता. तसेच, जिन्यामधून उतरताना तिचा हात पकडण्याचा देखील प्रयत्न केला. एका त्याने पकडलेल्या हात हिसका मारून तिने सोडवून घेतला होता. त्याच्या भीतीने या मुलीने महाविद्यालयात प्रवेशच घेतला नव्हता. याबाबत पिडीत मुलीच्या आईने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच, आरोपीवर कारवाईची मागणी केली होती. महिला आयोगाकडून याबाबत पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या तक्रारी अर्जाची सहकारनगर पोलिसांनी चौकशी केली. सर्व बाबी पडताळून पाहिल्यांतर बोराडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक युवराज पठारे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest