Pune News: पीएमपी बसच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे : रस्त्याने चालत जात असलेल्या ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रामटेकडी येथील मिलिंद बौद्ध विहाराजवळ

PMPML

संग्रहित छायाचित्र

रामटेकडी येथील मिलिंद बौद्ध विहाराजवळ घडला प्रकार

पुणे : रस्त्याने चालत जात असलेल्या ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रामटेकडी येथील मिलिंद बौद्ध विहाराजवळ घडला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

दिनकर भिकु रणखांबे (वय ८२, रा. ठोंबरे वस्ती, रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पीएमपी (PMPML)बस क्रमांक एमएच १२, क्यूजी ३२४८ या बस वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर रणखांबे हे राहात्या घराकडे चालत जात होते. त्यावेळी भरधाव बसची त्यांना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest