Pune News: सहकारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मॅनेजिंग डायरेक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : औंध येथील आयडीएम वर्क्स सॉफ्टवेअर कंपनीमध्ये (IMD Works Software Company) काम करणाऱ्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

औंध येथील आयडीएम वर्क्स सॉफ्टवेअर कंपनीमधील घटना

पुणे : औंध येथील आयडीएम वर्क्स सॉफ्टवेअर कंपनीमध्ये (IMD Works Software Company) काम करणाऱ्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध (एमडी) चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

रत्नेश डांगी (वय ४५, रा. पंचशील टॉवर्स, ईऑन आयटी पार्कच्या मागे, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादवि ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार जुलै २०२३ ते आजपर्यन्त घडला. औंध येथील आयटीआय रोडवर असलेल्या सॉलिटेअर बिल्डिंगमध्ये या आयटी कंपनीचे कार्यालय आहे. या आयटी कंपनीमध्ये आरोपी आणि पिडीत महिला काम करतात. पिडीत महिला वरिष्ठ अधिकारी आहे. तर, आरोपी डांगी हा तिचा वरिष्ठ असून कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. तो मागील सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करीत असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच तो तिला कामावरून तसेच अन्य कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने केबिनमध्ये सतत बोलावून घेत होता. कामाच्या बहाण्याने तिच्या शरीराला मनाविरुद्ध स्पर्श करीत होता. या महिलेला त्याने पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवले. दुप्पट पगार करून देण्यासाठी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याकडे तपास देण्यात आला आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने तपासावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest