पुणे: लग्नात मर्सिडीज दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

पुणे : लग्नात मर्सिडीज गाडी भेट दिली नाही या काराणावरून तसेच व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावेत याकरिता विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Pune Police

संग्रहित छायाचित्र

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : लग्नात मर्सिडीज गाडी भेट दिली नाही या काराणावरून तसेच व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणावेत याकरिता विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सासरच्या व्यक्तींवर भादवि ४९८ (अ), ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१५ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत लोणावळा येथे तसेच बाणेर येथे घडला. 

पती योगेश नामदेव चव्हाण (वय ४०), सासू विमल नामदेव चव्हाण (वय ६५), सासरे नामदेव रामभाऊ चव्हाण (वय ७०), दीर उज्वल नामदेव चव्हाण (वय ४६), सुहास नामदेव चव्हाण (वय ४४, सर्व रा. श्रयसाफल्य, आदर्श कॉलनी, लोणावळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही महिला गृहीणी असून औंध येथे राहण्यास आहे. त्यांना एक मुलगी आहे. चतु:शृंगी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आणि योगेश यांचे २०१५ साली लग्न झाले होते. त्यांचे लग्न ठरल्यानंतर जेव्हा जेव्हा योगेश त्यांना भेटायचा त्यावेळी लग्नात आईवडीलांकडून मर्सिडीज गाडी घेऊन येण्यासाठी दबाव टाकायचा. तसेच, लग्न मेरियट हॉटेलमध्ये लावून द्यावे अशी गळ घालायचा. या दोन्ही मागण्या पूर्ण करा अन्यथा लग्नच करणार नाही अशी धमकी देत होता. 

मात्र, लग्नात फिर्यादीच्या आईवडिलांकडून या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. फिर्यादीच्या वडिलांनी लग्नात मर्सिडीज गाडी दिली नाही यावरून लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी त्रास देण्यास सुरुवात केली. फिर्यादीला वारंवार ‘तुझ्या आईवडिलांनी काही शिकवले नाही. फिर्यादीला मोठ्या माणसांचा मान राखता येत नाही.’ असे म्हणत सतत टोमणे मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, फिर्यादीचे पती योगेश हे नोकरी करीत होते. त्यांनी नोकरी सोडून व्यवासे करायचे ठरवले. त्यांनी व्यवसाय सुरू केला. पुन्हा नोकरी केली. अशी कामाची धरसोड सुरू होती असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच फिर्यादीच्या पतीने व्यवसायासाठी माहेराहून आईवडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

माहेराहून पैसे आणले नाहीत तर सासरी राहायचे नाही अशी धमकी दिली. वारंवार फिर्यादीच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करून त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. यासोबतच सासू, सासरे, तसेच दीर यांना या बाबत फिर्यादी यांनी सांगितले. त्यावेळी दीर, सासू, सासरे यांनी ‘जसे मुलगा जसे म्हणेल तसे वागावे लागेल. नाहीतर निघून जा.’ असे धमकी दिली. तसेच, त्यांच्या दिरांनी फिर्यादीच्या पतीला भडकावले. त्यानंतर पतीने फिर्यादीला अधिकच शारिरीक, मानसिक आर्थिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांची मुलगी त्यांना भेटायला आली होती. ही मुलगी जर परत पाठवली नाही तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा वारंवार शारिरीक मानसिक छळ केल्याचे आणि फिर्यादीच्या भावाला फोनवरुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कुलकर्णी म्हणाले की, विवाहितेच्या तक्रारीवरुन आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. पुढील तपास सहायक निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest